imgonline com ua CompressToSize fBQdZOMtzaxNs

जागतिक निद्रा दिन (World sleep day 2021) का साजरा केला जातो ? | World sleep day in marathi

जागतिक निद्रा दिन २०२१ (world sleep day in marathi) :- मानवी आयुष्यात झोपेचे किती महत्वाचे स्थान आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जर पुरेशी झोप नाही मिळाली तर त्याचा सरळ परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. यासाठीच झोपेचे महत्व (world sleep day importance) लोकांना कळावे म्हणून दर वर्षी मार्च महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी हा जागतिक निद्रा दिवस (world sleep day २०२१) संपूर्ण जगभर साजरा केला जातो.

नमस्कार मंडळी आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला जागतिक निद्रा दिन (world sleep day in marathi) या संबंधित पूर्ण माहिती देणार आहे.

जागतिक निद्रा दिन इतिहास (world sleep day history in marathi)

झोप आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहे. पुरेशी झोप घेणारा व्यक्ती नेहमी निरोगी राहतो. जो व्यक्ती फार कमी वेळ म्हणजेच दिवसातून ६-७ तासापेक्षा कमी झोपतो त्याचे शरीर अनेक रोगांच्या आहारी जाते. म्हणून मानवी आयुष्यात झोपला खूप महत्व दिले जाते.

लोकांना झोपेचे महत्व समजावे यासाठी जगभरात दरवर्षी मार्च महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी जागतिक झोप दिवस (world sleep day 2021) साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम २००८ मध्ये साजरा करण्यात आला होता. तेंव्हा पासूनच जागतिक निद्रा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

यासाठी एक जागतिक स्लीप डे कमिटी देखील आहे जी दर वर्षी या दिवसाचे आयोजन करते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे ” झोपेच्या विकारांचे चांगल्या प्रकारे निवारण आणि व्यवस्थापन करून समाजावरील झोपेच्या समस्येचे ओझे कमी करणे ” हा आहे.

Also read : चिमणी पक्षी माहिती

हा दिवस दर वर्षी एकाच तारखेला साजरा केला जात नाही, वर मात्र निश्चित असतो शुक्रवार. वर्ल्ड स्लीप डे (world sleep day) हा २०१९ मध्ये १५ मार्च ला साजरा केला होता. यावर्षी हा दिवस १९ मार्चला साजरा केला जात आहे आणि पुढील वर्षी २०२२ मध्ये हा दिवस १८ मार्चला साजरा केला जाईल.

जागतिक झोप दिवस (world sleep day in marathi) का साजरा केला जातो ?

World sleep day in marathi

मानवी आयुष्यात झोपेचे खूप महत्व आहे. एका दिवसात कमीत कमी ७-८ घंटे तरी गाढ झोप माणसाने घ्यायला हवी. जर जोप अपुरी असेल तर त्यामुळे आपण कित्येक रोगांना बळी पडू शकतो. यामुळे हृदयविकार, मानसिक आजार, रक्तदाब, वजन वाढणे, यासारखे अनेक आजार होऊ शकता. त्यामुळे डॉक्टर देखील नेहमी कमीत कामी ७ तासाची झोप घ्यायला सांगतात. यामुळे मन प्रसन्न राहते आणि आरोग्यही चांगले राहते.

पण आज एकविसाव्या शतकात प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी माणूस दिवस रात्र धावपळ करत राहतो. यामुळेच तो कित्येक वेळा पुरेशी झोप घेऊ शकत नाही. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे.

Also read : मोर पक्षी माहिती

लहान मुले देखील कमी झोपेमुळे झोपेच्या अनेक आजारांना बळी पडत आहे. यात चिडचिडा पणा येणे, कमी जेवणे, भूक न लागणे, लठ्ठपणा येणे, मानसिक क्षमता कमी होणे यासारखे आजार आहेत.

एका वैज्ञानिक संशोधनातून असे समोर आले आहे की जे लोक अगदी कमी झोप घेतात ते लवकर म्हातारे होतात, त्यांचे शरीर लवकर साथ सोडते. शिवाय जे लोग पुरेशी झोप घेतात ते नेहमीच तरुण दिसतात.

चांगली झोप घेतल्यामुळे चहरा देखील उजळतो. जे लोक पुरेशी झोप घेतात त्यांचा चेहरा नेहमी टवटवीत असतो आणि त्यावर मुरूम आणि काळे डाग देखील फार कमी असतात. कारण पुरेशी झोप घेतल्यामुळे चेहऱ्यावरील पेशींची वाढ वेगाने होते आणि चेहरा नेहमी तेजस्वी दिसू लागतो.

झोपेचे हे सर्व महत्व पटवून सांगण्यासाठी आणि झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंध लोकांच्या लक्षात यावा यासाठी जगभरात दर वर्षी फेब्रुवारी महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच या वर्षी १५ मार्च २०२१ रोजी जागतिक झोप दिवस (world sleep day in marathi) साजरा केला जातो.

झोपे बाबत मजेशीर तथ्य (interesting facts about sleep in marathi)

  1. मांजर तिच्या आयुष्यातील ७०% वेळ झोपेत घालवते.
  2. मनुष्य आयुष्यातील १/३ भाग म्हणजेच एक त्रितांश भाग झोपतो.
  3. मनुष्य झोपेविना जास्तीत जास्त केवळ ११ दिवस जगू शकतो.
  4. जे लोक ७ तासापेक्षा कमी झोपतात त्यांची वयोमर्यादा १२% ने कमी होते.
  5. जपानमध्ये जर एखादी व्यक्ती काम करत असताना झोपली तर ते चांगली गोष्ट मानली जाते. कारण एखादी व्यक्ती काम करत असताना झोपली म्हणजे ती काम करून थकली असावी, असे जपान मध्ये मानले जाते.
  6. डॉल्फिन हा मासा झोपला असताना त्याचा अर्धा मेंदू सक्रिय असतो आणि उर्वरित अर्धा झोपेत म्हणजेच निष्क्रिय असतो.
  7. उंट एका दिवसात केवळ १.९ घंटे झोप घेतो.
  8. घोडा नेहमी उभा राहूनच झोपतो.

जागतिक निद्रा दिवस महत्व (importance of world sleep day in marathi)

एकविसाव्या शतकातील मनुष्याचे जीवन खुप धावपळीचे आहे. यात मनुष्य सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत दिवसभरात अनेक कामात व्यस्त असतो. त्यामुळे दिवसभरात केलेल्या कामाचा थकवा, ऑफिस मधील कामाचा ताण, जेवणाची गैरसोय, बाहेरचे जंकफूड खाणे यामुळे मनुष्याच्या झोपेवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळेच मनुष्य अनेक विकारांना बळी पडत आहे. यामुळे केवळ शारीरिक आरोग्यावर नव्हे तर मानसिक आरोग्यावर देखील तेवढेच परिणाम होत आहेत.

त्यामुळे ” world sleep day community ” ने उचलेले पाऊल कौतुकास्पद आहे. निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप फार गरजेची आहे. म्हणून तुम्हाला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर कमीत कमी ७ तास झोप घेणे आवश्यक आहे.

तुम्हाला मराठी युक्ती ब्लॉग कडून happy world sleep day !

पुरेशी झोप घ्या, निरोगी राहा

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला जागतिक निद्रा दीन (world sleep day in marathi) याबद्दल माहिती दिली. तसेच यात मी तुम्हाला जागतिक निद्रा दिनाचे महत्त्व, इतिहास याबद्दल देखील माहिती दिली आहे.

जागतिक निद्रा दीन (world sleep day 2021) हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *