imgonline com ua CompressToSize NTqxsQtvrKU

ताज महल माहिती (Taj Mahal information in marathi)

ताज महल माहिती ( Taj mahal information in marathi ) :- ताज महल म्हणजे भारताची शान, प्रेमाचे प्रतीक, जगातील सात आश्चर्ये पैकी एक आणि एक उत्रकुष्ट वास्तुशास्त्राचा नमुना म्हणून ओळखले जाते. आज जगामध्ये जे सात आश्चर्य आहेत त्या सात आश्चर्य मध्ये आपल्या भारत देशातील ताज महल या वास्तुकलेची गणना होते. ही खरंच आपल्या भारतीय लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

आजच्या या पोस्टमध्ये आपण याच सुंदर वस्तुकलेबद्दल म्हणजेच ताज महल बद्दल मराठीतून माहिती (Taj mahal information in marathi) तसेच ताज महल चा इतिहास (taj mahal history in marathi) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

ताज महल माहिती (Taj mahal information in marathi )

ताज महाल ही एक भारतीय सौंदर्याचे प्रतीक म्हणून मानली जाणारी सुंदर वास्तू आहे. याच ताजमहाल ला मानवी कला व कर्यांचा उत्कृष्ट नमुना म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. दरवर्षी जगभरातून ३०-४० लक्ष पर्यटक ही असामान्य वास्तू पाहण्यासाठी येत असतात. ताज महाल हे भारतीय पर्यटनाचे केंद्र बिंदू आहे.

मुघल बादशाह शाहजहान याने आपली प्रिय पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताज महाल ही सुंदर वास्तू निर्माण केली. ही वास्तू शहाजांची पत्नी मुमताज महल च्या मृत्यू नंतर बांधण्यात आली. त्यामुळे ताज महाल ही वास्तू प्रेमाचे प्रतिक म्हणून देखील नावलौकिक मिळवून आहे.

ताज महाल ही वास्तू भारत देशातील आग्रा शहरात स्थित आहे. आग्रा शहर हे उत्तर प्रदेश राज्यातील यमुना नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे. असे म्हटले जाते की ताज महाल ही वास्तू बांधण्याच्या वेळेस अनेक कामगारांची यात कुर्बानी दिली होती. उस्ताद अहमद लाहोरी हे या ताज महल वास्तू चे मुख्य डिझाईनर मानले जातात. ताज महाल ही वास्तू मुघल सम्राट शहाजहानच्या आदेशानुसार बांधण्यात आली. ताज महल बांधण्यासाठी उस्ताद अहमद लाहोरी याच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २०००० ते २५००० कामगारांनी काम केले. आज ही वास्तू जगात मुघल स्थापथ्याशैलीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून ओळखले जाते.

तसेच ताज महाल या वास्तूला युनेस्को ने १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. आज ताज महल ही वास्तू जगातील सात आश्चर्ये पैकी एक आहे. त्यामुळे मानवी कार्याचे उत्कृष्ट उदाहरण असणाऱ्या या वास्तूला पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक व अभ्यासक येत असतात.

ताज महल वास्तूचे बांधकाम ( taj mahal information in marathi )

उत्कृष्ट कलाकुसर आणि सौंदर्याने जगातील इतिहासकार आणि अभ्यासक यांना भुरळ घालणारे व युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्धी लाभलेले ताज महल हे एक भारतातील अप्रतिम पर्यटन स्थळ आहे. याला मुघल सम्राट शहाजहानने आपली प्रिय पत्नी मुमताज महल च्या प्रेमा प्रीत्यर्थ आणि एक आठवून म्हणून बांधले.

आज हे स्थळ प्रत्येक पर्यटकाला आपल्या वास्तू शास्त्राच्या अप्रतिम नमुण्याने भुरळ घालत आहे व अचंबित करत आहे. पांढरा शुभ्र संगमरवरी दगडापासून बनवलेली ही वास्तू खरचं मानवाच्या अतिउत्तम कार्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

” Taj mahal information in marathi “

ताज महालची निर्मिती पर्शियन आणि प्राचीन मुघल कलाचा अभ्यास करून करण्यात आली. ताज महालचे निर्माण करण्यासाठी पांढरा शुभ्र संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला. त्यामुळे ताजमहालाच्या सुंदर्तेत आणखीनच भर पडली. अशा म्हणतात की ताजमहाल चे वेळेनुसार रंग बदलतात. सकाळी तो पांढरा रंगाचा दिसतो, सायंकाळी गुलाबी रंगाचा भासतो.

ताज महाल ही केवळ एक वास्तू नसून तर ताज महाल हा अनेक इमारतींचा एक संच आहे. यात मुख्य इमारत, चार मनुरे, दोन मशिदी आणि काही इतर इमारतींचा समावेश आहे. ताजमहाल च्या चारही कोपऱ्यात चार सुंदर तलाव आहेत आणि मधल्या बाजूला पाण्याचे फवारे सोडणारे सुंदर कारंजे आहेत.

चारही दिशांना सुंदर बाग आहे, त्यात ताज महाल परिसराला शोभा देणारे सुंदर झाडे आहेत आणि पर्यटकांना बसण्यासाठी बाकांची देखील व्यवस्था आहे.

ताज महालमध्ये मुख्य इमारतीच्या मधोमध मुमताज महल ची समाधी आहे. या समाधीला मुस्लिम परंपरेनुसार सजवण्यात आलेले आहे तसेच विविध अलंकारांनी सुशोभित करण्यात आलेली आहे.

ताज महालच्या वरच्या टोकाला एक छिद्र करण्यात आलेले आहे. या छिद्रातून मान्सून मध्ये पाण्याची थेंबे मुमताज बेगमच्या समाधीवर पडतात. याच्यावर अनेक कथा इतिहासात प्रचलित आहेत. असे म्हटले जाते की शाहजहान ने कामगारांना अशी ताकीद दिली होती की, ताज महाल मध्ये कुटलीहि चूक किंवा कमतरता निघता कामा नये. ही वास्तू पूर्ण झाल्यानंतर शाहजहान कामगारांचे हात कापणार होता.

त्यामुळे ताजमहाल मध्ये एखादी चूक असावी व शाहजहान पुन्हा ती चूक आपल्याला दुरुस्त करण्यासाठी सांगेन या हेतूने काही कामगारांनी ताज महलच्या वरच्या टोकाला एक छिद्र केले होते. पण तेच छिद्र आज ताजमहाल ची सुंदरता वाढवत आहे. असे म्हटले जाते की ताज महल ही वास्तू पुन्हा कुणी तयार करू नये म्हणून शाहजहान ने ताज महल पूर्ण झाल्यानंतर कामगारांचे हात कापले होते.

ताज महल इतिहास (taj mahal history in marathi)

ताज महालचा इतिहास खूप जुना आहे. यात ताज महल बद्दल अनेक प्रचलित कथा आहेत. ताज महाल हा १६३२ मध्ये मुघल सम्राट शहाजहानने आपली पत्नी मुमताज बेगमच्या स्मरणार्थ बांधला आहे. ही वास्तू यमुना नदीच्या तीरावर वसलेल्या आग्रा शहरात आहे.

ताज महालाच्या बांधकामासाठी खास करून पांढरा शुभ्र संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला. त्यामुळे इतके वर्ष होऊनही ताज महल मध्ये आज तीच चमक आहे. या वास्तूला अशा प्रकारे निर्माण केले आहे की यावर भूकंप किंवा कोणत्याही नैसर्गिक आपतींचा कुठलाही परिणाम होत नाही.

परंतु आजच्या वाढत्या प्रदूषणामुळे पांढरा शुभ्र ताजमहाल चा रंग पिवळसर तपकिरी होत आहे. ही वास्तू म्हणजे भारत देशातील पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

ताज महल हा १७ हेक्टर म्हणजेच ४२ एक्कर मध्ये पसरलेला आहे. यात काही मनुरें, दोन मशीद, एक गेस्ट हाऊस, तलाव , कारंजे आणि एक सुंदर बाग यांचा समावेश आहे.

ताज महल ची निर्मिती १६४३ मध्ये पूर्ण झाली. परंतु ताज महाल ला आणखी सुशोभित करण्यासाठी नंतर पुढे १० वर्षे काम चालले. १६३० मध्ये सुरू झालेल्या ताज महल च्या कामाला पूर्ण होण्यासाठी २२ वर्षे लागली. यात ३७ मुख्य डिझाईनर आणि २५००० पेक्षा जास्त कामगारांनी आपले योगदान दिले. ताज महल ची मुख्य इमारत ६० फूट उंच आणि ८० फूट लांब आहे. ताज महलचा इतिहास (history of taj mahal in marathi) खूप जुना आणि रोमांचकारी आहे.

ताज महल पर्यंत कसे पोहचावे ? (How to reach taj mahal )

ताज महल ही वास्तू पाहण्यासाठी आग्रा शहरापर्यंत कसे पोहचावे.  यासाठी तुम्ही बस, कार,रेल्वे किंवा मग विमान यापैकी एकाची प्रवासासाठी निवड करू शकता.

  1. दिल्ली ते आग्रा (२३३ किमी ) (४ तास ३४ मी)
  2. मुंबई ते आग्रा (१२०५ किमी) (२१ घंटे ५७ मी)
  3. पुणे ते आग्रा (१२१४ किमी)  (२२ घंटे ५४ मी)

वरती पोहचण्यासाठी दिलेला वेळ हा बस आणि कार आणि रेल्वे यांच्यासाठी दिलेला आहे. तसेच पुणे, मुबई आणि दिल्ली पासून अग्र्याचे अंतर दिलेले आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्रवास करू शकता.

टीप : मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला ताज महल माहिती (taj mahal information in marathi) आणि ताज महल चा इतिहास (taj mahal history in marathi) याबद्दल माहिती दिली. तसेच मी तुम्हाला ताज महल पर्यंत कसे पोहचावे याबद्दल देखील सांगितले.

Taj mahal information in marathi या पोस्टमध्ये सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे. अशीच उपयुक्त माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट देत रहा.

तुम्हाला ताज महल माहिती (taj mahal information in marathi) आणि ताज महल चा इतिहास (taj mahal history in marathi) कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला आणखी एखाद्या विषयी माहिती हवी असेल तर तेही कळवा. मी त्यावर नक्कीच लेख लिहील, धन्यवाद…!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *