imgonline com ua CompressToSize 0qeMmOAxWq

चिमणी या पक्ष्याबद्दल आश्चर्यकारक माहिती | sparrow bird information in marathi

चिमणी या पक्ष्याबद्दल आश्चर्यकारक माहिती sparrow bird information in marathi :- चिमणी हा एक छोटासा दिसणारा पक्षी खूपच सुंदर आहे. तो भारत देशामध्ये तर आढळतोच त्याशिवाय आशिया आणि युरोप खंडातील बऱ्याच देशात त्याचे अस्तित्व आहे.

आजच्या या पोस्ट मध्ये मी तुम्हाला चिमणी या पक्षयाबद्दल मराठी माहिती sparrow bird information in marathi सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

चिमणी पक्षी माहिती मराठी | sparrow bird information in marathi (३०० शब्दात)

चिमणी एक छोटासा पक्षी आहे जो भारत देशातील जवळपास सर्वच भागामध्ये आढळतो. तसेच हा पक्षी आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील देखील बऱ्याच देशात आढळणारा पक्षी आहे. हा पक्षी खूपच लहान आणि नाजूक दिसतो. त्याचे इवले इवले पंख तो सतत हलवत असतो.

हा पक्षी मुख्यतः ग्रामीण भागात जास्त पाहायला मिळतो. तो शेतात, रानावनात उंच झाडावर घरटी करून राहतो. घरटी बनवण्यासाठी तो खूप मेहनत घेतो. गवताची एक एक काडी गोळा करून तो आपल्या पिलांसाठी सुंदर आणि मऊशार घरटी बनवतो. चिमणी आपले घरटे केवळ झाडावरच बांधत नाही तर ती कित्येक वेळा उन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून माणसांच्या घरात देखील घरटे बांधते.

चिमणी या पक्ष्यामध्ये नर आणि मादी हे दोन्ही जवळपास सारखेच दिसतात. पण ते सहज ओळखले जाऊ शकतात. नर चिमणीच्या मानेवर काळया रंगाची पट्टी असते. नर आणि मादी दोन्ही भुरकट, पांढरा रंगाचे असतात. नर पक्ष्याला “चिमणा” असे म्हटले जाते तर मादीला “चिमणी” असे म्हटले जाते.

मादा चिमणी वर्षातून दोन वेळा अंडी देते. ती एका वेळेस दोन ते तीन अंडी देऊ शकते. हे अंडी घरट्यातून खाली पडू नयेत, त्यांचे गिधाड या पक्ष्यापासून संरक्षण व्हावे म्हणून चिमणी खूप काळजी घेते. चिमणी या पक्ष्याची पिले १० ते १५ दिवसात अंड्यातून बाहेर येतात.

चिमणी त्यांच्या पिलांची फक्त तोपर्यंत सांभाळ करते जोपर्यंत ते स्वतंत्र उडण्यासाठी सक्षम होत नाहीत. जेंव्हा पिलांना पंख फुटतात, ते स्वतंत्रपणे उडू लागतात तेंव्हा चिमणी पिलांपासून दूर निघून जाते. तिथून पुढे पिल्ले स्वतःचे रक्षण स्वतः करतात.

चिमणी आपल्या पिलांचा सांभाळ करत असताना जर एखादे पिलू घरट्यातून खाली पडले आणि त्याला माणसाने स्पर्श केला तर चिमणी त्या पिलाला स्वीकारत नाही असे म्हटले जाते.

चिमणीचे खूप इवले इवले पंख असतात ती या छोट्याशा पंखाणे उंच हवेत भरारी घेते. चिमणी हा खूपच चंचळ पक्षी आहे. तो सतत हालचाल करत असतो. चिमणी तिची शेपूट सतत हलवत असते. ती कधीही स्वस्त बसत नाही.

चिमणी शेतात रानावनात राहून गहू, ज्वारी, बाजरी यासारखी धान्याची दाने, किडे अळ्या, खाते. ती शेतात राहून पिकांना नुकसान करणाऱ्या अनेक किड्यांना, आळ्याना खाऊन फस्त करते. त्यामुळे चिमणी हा पक्षी शेतकरी राजाला खूप प्रिय आहे.

शेतकरी शेतात चिमणी या पक्ष्यासाठी उन्हाळ्यात खूप व्यवस्था करतो. तो त्यांच्यासाठी अन्न आणि पाण्याची देखील व्यवस्था करून ठेवतो. यासाठी झाडांच्या फांद्यांना पाण्याने भरलेले डबके अडकवून ठेवतो आणि झाडाच्या बुंध्यावर अन्न धान्य ठेवतो. त्यामुळे चिमणी शेतात खुशाल राहते.

चिमणीला लहान मुले “चिवूताई” असे म्हणतात. लहान मुलांना देखील चीवूताई खूप प्रिय असते. चिमणीच्या मधुर आवाजाने सकाळचे शांत वातावरण अगदी आल्हादायक बनते. चिमणी हा पक्षी खूपच सुंदर असल्यामुळे तो सर्वांनच खूप आवडतो.

चिमणी पक्षी माहिती मराठी | sparrow bird information in marathi (५०० शब्दात)

Sparrow bird information in marathi

चिमणी हा मानवी मनाला मोहून टाकणारा खूपच सुंदर पक्षी आहे. त्यामुळे तो सर्वानाच खूप प्रिय आहे. शिवाय त्याचा चिवू चीवू… असा आवाज देखील खूपच गोड असतो. त्याच्या आवाजाने सकाळ झाली सांजचे वातावरण खूप प्रसन्न होते.

चिमणी हा भारत देशाबरोबर च पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका यासारख्या त्याच्या नाजदिकच्या देशात देखील आढळतो. चिमणी या पक्ष्याचा संपूर्ण जगभरात ४० पेक्षाही जास्त प्रजाती आढळतात. हा पक्षी भुरकट, पांढरा, पिवळ्या, निळ्या, हिरव्या यासारख्या अनेक रंगामध्ये आढळून येतो.

भारत देशात भुरकट पांढरा रंगाची चिमणी आढळते. चिमणी हा पक्षी १२ ते २६ सेमी लांब असतो. त्याचे वजन २५ ग्राम ते ५० ग्रामच्या मध्ये असते. तसेच काही देशात ५० ग्राम पेक्षा जास्त वजनाचा देखील चिमणी हा पक्षी आढळतो.

चिमणी हा पक्षी ग्रामीण भागातील रानावनात आढळून येतो. तो धान्याचे कण, किडे आळ्या, खाऊन स्वतःचा उदरनिर्वाह करतो. हा पक्षी नेहमी झुंड करून राहतो.

चिमणी हा पक्षी शहरी भागात आज फार क्वचितच पाहायला मिळत आहे. शहरातील उद्योगधंदे, कारखाने, पेट्रोल डिझेल इंजिन वर चालणारी वाहने यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे चिमणी या पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे शहरी भागात आढळणाऱ्या चिमणी या पक्ष्यांच्या प्रजाती आज दुर्मिळ होत चालल्या आहेत. शिवाय शहरात मानवी वस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते. त्यामुळे या पक्ष्यांची निवासस्थाने नष्ट होतात.

मानवाने विकसित केलेले तंत्रज्ञान पशू पक्ष्यांच्या जीवावर बेतले आहे. मोबाईल हे तंत्रज्ञान माणसांसाठी जरी वरदान असले तरी ते चिमणी सारख्या पक्ष्यांसाठी श्राप ठरत आहे. मोबाईल टॉवर मधून निघणारे सिग्नल तरंग पक्ष्यांसाठी खूपच घातक आहेत. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त पक्षी मरण्याचे एकमेव कारण म्हणजे टॉवर मधून निघणारे हे घातक सिग्नल आहेत.

चिमणी हा खूपच सुंदर पक्षी आहे. शिवाय तो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी देखील खूप महत्वाचा पक्षी आहे. त्याचे आयुष्य वाचवणे आणि त्यांच्या दुर्मिळ होणाऱ्या प्रजातींचे रक्षण करणे खूप जास्त आवश्यक आहे.

म्हणूनच जागतिक स्थरावर चिमणी या पक्ष्याचे संरक्षण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. भारत सरकार देखील पक्षी संवर्धनासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यामुळेच संपूर्ण विश्वात २० मार्च हा दिवस ” जागतिक चिमणी दिवस” “world sparrow day” म्हणून साजरा केला जातो.

चिमणी हा पक्षी अन्न धान्याच्या शोधात अनेक किमी दूर प्रवास करतो. घार, घुबड, बहिरी ससाणा, साप, रानमांजर हे काही चिमणी या पक्ष्याचे शत्रू आहेत.  

आज चिमणी या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. चिमणी पक्ष्याचे आयुष्य ४ ते ७ वर्षाचे असते. हे पक्षी खूपच आकर्षक दिसतात. त्यांची पिवळ्या रंगाची चोच त्यांना खूपच उठून दिसते.

वर्तमानात चिमणी पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. त्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या पक्ष्याचे संरक्षण करणे खूप गरजेचे झालेले आहे. यासाठी सरकारने योग्य पाऊले नाही उचलली तर हा पक्षी नक्कीच संपुष्टात येऊ शकतो.

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या पोस्टमध्ये आपण चिमणी पक्षी माहिती मराठी sparrow bird information in marathi या विषयावर माहिती मिळवली. ही माहिती शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहे.

चिमणी पक्षी माहिती sparrow bird information in marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *