sant namdev information in marathi

संत नामदेव माहिती मराठी | sant namdev information in marathi

Sant namdev information in marathi – संत नामदेव हे भागवत धर्माचा पंजाब पर्यंत प्रसार करणारे एकमेव संत होऊन गेले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नितांत विठ्ठल भक्ती करून लोक कल्याणासाठी अनेक कीर्तने केली, ग्रंथ रचले. ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते.

संत नामदेव माहिती | sant namdev information in marathi

संत नामदेव हे महाराष्ट्रातील सर्वाधिक जुन्या कवी पैकी एक संत कवी होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक अभंगाची रचना केली. आजही नामदेवाचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील लोक ते भजन कीर्तनात गुणगुणत असतात. त्यांनी वज्र भाषेमध्ये अनेक अभंग रचली. त्यांचे अनेक अभंग शीख धर्मियांच्या ग्रंथसाहिब या ग्रंथात नमूद आहेत.

संत नामदेव हे भागवत धर्माचे आद्य प्रसारक म्हणून देखील ओळखले जातात. कारण त्यांनी भागवत धर्म संपूर्ण महाराष्ट्रात तर पसरवला शिवाय त्यांनी या धर्माचा पंजाब पर्यंत देखील प्रसार केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याण आणि भक्ती सगरात विलीन केले होते.

संत नामदेव जन्म:

संत नामदेव यांचा जन्म २६ आक्टोबर १२७० रोजी झाला. त्यांचा जन्म नरसी बामणी या गावी झाला असे सांगण्यात येते. नरसी आणि बामणी ही दोन्ही गावे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील दोन वेगवेगळी गावे आहेत. ही गावे अगदी निकट असल्यामुळे संत नामदेवांचा जन्म नरसी – बामणी या गावी झाला असे म्हटले जाते.

संत नामदेवांच्या जन्म गावाविषयी अनेक मतभेद आहेत. काही लोक नरसी बामणी हे नामदेवांचे जन्मगाव मानतात तर काहींचे असे म्हणणे आहे की संत नामदेवांचा जन्म पंढरपूर येथे झाला होता. यावरून अनेक मतभेद मांडण्यात येतात.

संत नामदेव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतकवी होते. त्यांचे संपूर्ण नाव नामदेव दामाजी (दामा शेट्टी) रेळेकर असे आहे. त्यांचा मूळ व्यवसाय हा शिंपी होता.

संत नामदेवांचे जीवन:

संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचे आद्य प्रचारक होते. त्यांनी लोककल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते व्यवसायाने शिंपी होते. परंतु त्यांनी आपल्या आयुष्यात विठ्ठल भक्ती शिवाय दुसरे काहीच केले नाही.

त्यांनी अनेक अभंग रचले, काव्य रचना केल्या. आपल्या कीर्तन कलेतून प्रत्यक्ष विठोबाला डोलवणारी अशी त्यांची वृत्ती होती. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले. भागवत धर्माचा संपूर्ण भारतभर प्रसार करून त्यांनी धार्मिक भावणात एकात्मता निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माचा पताका पंजाब पर्यंत पोहचवण्याचे अनमोल कार्य केले.

पंजाब मधील सर्व शीख धर्मीय लोक त्यांना आपलेसे मानतात. ‘ नामदेव बाबा ‘ असे त्यांचे वर्णन करून गुणगान गातात. शिवाय नामदेवांचे अनेक अभंग गुरू ग्रंथसहिब या ग्रंथात प्रसिद्ध आहेत. संत नामदेव महाराज यांचे ‘ संत शिरोमणी ‘ असे यथार्थ वर्णन केले जाते. तसेच पंजाब आणि राजस्थान मधील अनेक ठिकाणी शीख धर्मियांनी संत नामदेवांची मंदिरे उभारली आहेत.

संत नामदेव यांच्या वडिलांचे नाव दामोजी (दामाशेट्टी) आणि आईचे नाव गोनाई असे होते. दामाशेट्टि कपडे शिवायचे म्हणजे ते व्यवसायाने शिंपी होते. त्यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील यादुषेट्ट हे भागवत भक्त होते.

एक वेळेस संत गोरा कुंभार यांच्याकडे संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखा मेळा, विसोबा खेचर आदी संत मंडळी जमली होती. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सांगण्यावरून संत गोरोबाकुंभार यांनी आध्यात्मिक तयारी बद्दल मार्गदर्शन केले. याच ठिकाणी संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू मिळाले. तर संत चोखा मेळा हे त्यांचे शिष्य होते.

संत नामदेव महाराज यांचे पत्नी राजाई सोबत लग्न झाले. यातूनच त्यांना नारायण, विठ्ठल, गोविंद, महादेव अशी चार मुले आणि लिंबाई ही मुलगी झाली. आऊबाई ही संत नामदेव महाराजांची बहिण होती. त्यांच्या परिवारात पंधरा सदस्य होते. संत जनाबाई या देखील त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवांचे साहित्य :

संत नामदेव महाराजांनी नामदेव गाथा रचली त्यात २५०० पेक्षा जास्त अभंग आहेत. त्यांनी शोरसेनी भाषेत देखील अभंग रचना केलेली आहे ज्यात १२५ पदे आहेत. यापैकी जवळपास बासष्ट अभंग नामदेवजिकी मुखबानी म्हणून शीख धर्मियांच्या  गुरुग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात गुरुमुखी लिपीत घेतलेली आहेत. तसेच त्यांनी आदी, समाधी आणि तिर्थावली या ग्रंथातील तीन आध्यायमधून संत ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर चरित्र सांगितले आहे.

संत नामदेव हे फार जुन्या काळातील कीर्तनकार होते. यातून त्यांनी अनेक तळागाळातील लोकांमध्ये जागृती करून वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. त्यांच्या कीर्तनात अनेक ग्रंथाचा उल्लेख ते करत असत, प्रत्येक वाक्याला ते धार्मिक ग्रंथांचे प्रमाण जोडत असत. त्यामुळे त्यांचे अनेक ग्रंथांचे अमाप वाचन आणि बहुशुशृत असल्याचे दिसून येते.

संत नामदेव महाराज भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून ओळखले जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समधिनंतर सुमारे ५० वर्ष नामदेव महाराजांनी भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य केले. याच काळात त्यांनी भागवत धर्म पंजाब प्रांतपर्यंत पोहचवला होता. त्यामुळे पंजाब मधील शीख धर्मीय लोक संत नामदेव महाराजांना खूप मानतात.

पंजाब आणि राजस्थान मधील शीख धर्मीय लोकांनी नामदेव महाराजांची अनेक मंदिरे उभारली आहेत. त्यांच्याबद्दल शीख धर्मीय लोक “संत शिरोमणी” असे यथार्थ वर्णन करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील संत नामदेवांनी महाराष्ट्राची आध्यात्मिक भावना संघटित ठेवण्याचे खूप मोठे कार्य केले. ” नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ” असे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

संत नामदेव महाराज बद्दल आख्यायिका:

संत नामदेव महाराज यांच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. संत नामदेव एक वेळेस जेवत असताना एका कुत्र्याने त्यांची भाकरी ओढून नेली. त्यावेळी संत नामदेव यांचे वर्तन जग निराळे होते. संत नामदेवांनी त्या कुत्र्याला न मारता, तू कोरडी भाकरी कशी खाशील म्हणून तुपाची वाटी घेऊन त्याचा पाठलाग केला.

नामदेव महाराज (sant namdev information in marathi) अगदी लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना देवाला प्रसाद दाखवण्यास सांगितले. त्यावेळी संत नामदेवांनी केवळ देवासमोर प्रसादच ठेवला नाही तर देव कधी हा प्रसाद खातो याची वाट पाहत ते देवाच्या समोरच बसले. संत नामदेव महाराजांचा हा निरागस भाव बघून देव देखील प्रगत झाला आणि देवाने तो प्रसाद ग्रहण केला अशी आख्यायिका आहे.

आणखी एका आख्यायिका मध्ये असे सांगितले जाते की, महाशिवरात्रीच्या दिवशी संत नामदेव महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा या धर्मस्थळी संत नामदेव भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी गेले असता भजन / कीर्तन करणाऱ्या काही लोकांनी त्यांनी विनवले. त्यामुळे त्यांनी भगवान शंकराच्या दर्शनासाठी मंदिराच्या पाठीमागे जाऊन आळवणी केली. त्यामुळे भगवान शंकरांनी संत नामदेवांना दर्शन देण्यासाठी पूर्वभिमुखन असणारे मंदिर पश्चिम भिमुख केले. आजही ते मंदिर तसेच आहे.

संत नामदेवांची समाधी :

संत नामदेव महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते त्यांनी आपल्या ८० वर्षांच्या आयुष्यात आतोनात विठ्ठलाची भक्ती केली. ते ८० वर्षांचे झाले असताना त्यांनी जगाला निरोप देण्याचे ठरवले.

त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी समोर विनंती केली की मला हा नाशवंत देव सोडून मुक्त होण्याची आज्ञा द्यावी. त्यानंतर नामदेवांनी आषाढ वद्य त्रयोदशीला शके १९७२ मध्ये पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी समाधी घेतली.

विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लागावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर संत नामदेव महाराजांची समाधी आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणारे सर्व भाविक भक्त अगोदर संत नामदेवांच्या समाधीचे दर्शन घेऊनच पुढे विठ्ठल दर्शनासाठी जातात.

आपण काय शिकलो :

मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला संत नामदेव महाराज यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (sant namdev information in marathi) सांगितली. यात संत नामदेव यांचे आरंभीचे जीवन, त्यांचे साहित्य, त्यांच्याबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या आख्यायिका आणि त्यांची समाधी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

संत नामदेव माहिती मराठीमध्ये (sant namdev mahiti) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला आशा आहे. संत नामदेव महाराज माहिती (sant namdev information in marathi) या लेखात केलेले संत नामदेवांचे यथार्थ वर्णन तुम्हाला नक्कीच आवडेल, धन्यवाद…!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *