imgonline com ua CompressToSize 6165t7ia11

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर बद्दल माहिती (peacock information in Marathi)

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर बद्दल माहिती (peacock information in Marathi) :- मित्रांनो तुम्हाला सर्वालाच माहिती असेल की भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. ज्याला संस्कृत मध्ये मयूर देखील म्हटले जाते. मोर हा पक्षी दिसायला खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. त्याचे रूप मनाला मोहून सोडणारे आहे.

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर (peacock information in marathi) बद्दल माहिती घेणार आहोत.

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर बद्दल माहिती ( peacock information in Marathi ) भाग – १

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. मोराचे रूप हे खूपच सुंदर आणि मनाला आकर्षित करणारे असते. त्यामुळे जो कुणी मोर पक्षी पहिल्यांदा पाहतो तो मोर पक्षाच्या प्रेमात पडतो. मोर पक्षी हा मुख्यतः खेडे गावामध्ये दऱ्या खोऱ्यात किंवा मग नदीच्या काठच्या दाट झाडीच्या भागात आढळतो. तसेच मोर पक्षी हे शेतात देखील अनेक वेळा पाहायला मिळतात.

मोर हा पक्षी आकाराने थोडा मोठा आणि वजनाने जड असतो. त्यामुळेच की काय त्याला उंच हवेत उडता येत नाही व हवेत तरंगत राहण्याची क्षमता देखील त्याच्यात नसते. मोर फक्त २० ते २५ फूट उंच हवेमध्ये उडू शकतात आणि तो उडल्यानंतर काही वेळातच जमिनीवर परत येतो.

मोर पक्ष्याचे आयुष्य १५ ते २० वर्षांचे असते आणि तो ४-५ किलो वजनाचा असू शकतो. मोर पक्षाला हवेत उडण्यापेक्षा जमिनीवर चालायला जास्त आवडते . त्यामुळे तो बहुदा जमिनीवर चलतानच दिसतो.

मोर हा पक्षी शिकारी प्राण्यापासून वाचण्यासाठी झाडावर वास्तव्य करतो.वाघ, रानमांजर आणि कोल्हा हे काही मोराचे शत्रू आहेत. साप आणि कीटक हे त्याचे मुख्य अन्न आहे. तो नदीकाठावर आणि शेतात फिरून कीटक, साप आणि शेतातील दवणे खात असतो. त्यामुळे मोर हा मांसाहारी प्राणी आहे जो की अन्नासाठी इतर भक्ष्य प्राण्यावर अवलंबून असतो. तसेच शाकाहारी देखील आहे कारण तो बहुदा जमिनीवर पडलेले अन्नधान्य देखील खात असतो.

मोर नेहमी झुंड करून राहतात. ते एकोप्याने अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. त्यांच्या झुंड मध्ये १-२ मोर आणि ३-४ लांडोरचा समावेश असतो. मोर हा नर पक्षी आहे आणि लांडोर ही मोराची मादा असते.

मोर प्राणी दिसायला खूपच सुंदर आहे. त्याच्या पाठीवर रंगीबेरंगी पिसारा असतो. यात रंगीबेरंगी अनेक पिसे असतात. या पिसांच्या टोकाला डोळ्यासारखे चित्र असते आणि त्याच्या आजूबाजूला निळ्या ,पिवळ्या, गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या छटा असतात. हा पिसारा मोराला खूप शोभून दिसतो.

Peacock information in marathi

मोराचा पिसारा हा जवळपास २००-२५० सेमी चा असतो. मोराच्या डोक्यावर तुरा असतो, मान लांब लचक असून ती निळ्या रंगाची असते. म्हणूनच मोराला नीलकंठ असे देखील म्हटले जाते.मोराचे पाय ओबडधोबड व कुरूप असतात.

पावसाळा ऋतूमध्ये मोर पिसारा फिरवून नृत्य करतो त्याला मयुरनृत्य असे म्हटले जाते. मोर नाचतानचा नजारा पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा प्रसंग असतो. हे दृश्य पाहिल्याने मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

मोर नृत्य करताना त्याचा पूर्ण पिसारा फुलवतो जो की खूपच मनमोहक वाटतो. हा क्षण पाहणे प्रत्येकाच्या भाग्यात नसते. मोराच्या पिसाला देखील खूप महत्व आहे. मोराचे पिस पवित्र मानले जाते त्यामुळे ते बहुदा देवघरात ठेवण्यात येते. तसेच तुम्ही अनेक फोटो मध्ये भगवान श्री कृष्णाच्या डोक्यावर देखील मोराचे पिस पाहिले असेल.

मोर मराठी माहिती (peacock information in Marathi) भाग – २

मोराचे सुंदर हिरवे निळे पंख, डोक्यावर सुंदर डोलदार तुरा पाहून कुणीही मोराच्या मोहात पडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच की काय मोराला पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जात. मोर हा कुकुट वर्गीय पक्षी असून त्याचे वैज्ञानिक नाव ‘ पावो क्रेस्टेट्स ‘ असे आहे.

प्राचीन काळापासून इतिहासात मोराचे वर्णन आढळून येत आहे. विद्येची देवता सरस्वती आणि महादेवाचा पुत्र कार्तिक यांचे वाहन मोरच आहे. तसेच पूर्वी अनेक राजांच्या काळातील नाण्यावर मोराचे अस्तित्व दिसून येते. मोर पिसांचा उपयोग पूर्वी राजसिंहासन, लिहिण्यासाठी आणि सौंदर्य प्रसाधने केला जायचा.

मोर पक्षी पाळणे किंवा त्याला मारणे आज कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही मोराला पकडुन घरामध्ये ठेऊ शकत नाही. तसेच मोरांची तस्करी म्हणजे मोरांची खरेदी विक्री करणे हा देखील कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे. असे करण्याचे कारण म्हणजे आज मोर हा पक्षी दुर्मिळ होत आहे. मोर पक्षाच्या अनेक प्रजाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी मोरांची संख्या अमाप होती पण आज ती अत्यल्प प्रमाणात आहे.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचे संरक्षण व्हावे आणि मोराच्या प्रजाती दुर्मिळ होण्यापासून वाचाव्यात यासाठी भारत सरकार द्वारे अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.भारत वासियांचे देखील हेच कर्तव्य आहे की मोराच्या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणे आणि भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराचे संरक्षण करणे.

मोराला मोर, मयूर, सारंग, शिखी, नीलकंठ अशा अनेक नावाने ओळखले जाते. मोर हा संपूर्ण भारतभर नद्या खोऱ्याचा क्षेत्रात आढळतो. तसेच मोर हा पक्षी भूतान, नेपाळ, पाकिस्तान सारख्या काही विदेशी देशात देखील आढळून येतो.

मोराच्या सुंदर आणि मोहक रुपामुळे व तसेच तो शांती आणि सौंदर्य चे प्रतीक असल्याकारणाने मोराला २६ जानेवारी १९६३ रोजी राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.

आपण काय शिकलो? 

आजच्या लेखामध्ये आपण भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर ( peacock information in Marathi) बद्दल माहिती जाणून घेतली. या लेखामध्ये मी मोराचे संपूर्ण वर्णन खूप सुंदर शब्दात व्यक्त केले आहे.

मोर (mor marathi mahiti) हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून मोर मराठी माहिती (peacock information in Marathi) हा लेख मी खास  आपल्यासाठी लिहिलेला आहे. मोर बद्दल ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल आशी मला अशा आहे, धन्यवाद…!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *