imgonline com ua CompressToSize VaYfihCs3ALVnvAh

पोपट पक्षी मराठी माहिती (parrot information in marathi)

पोपट पक्षी मराठी माहिती (parrot information in marathi) : नमस्कार मंडळी ! मानव हा पक्षी प्रेमी आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कोणता न कोणता पक्षी नक्कीच आवडतो. पक्ष्यांमध्ये पोपट हा पक्षी खूपच सुंदर आहे. पोपट हा पक्षी कित्येक लोक पाळतात देखील. तसेच पोपट पक्ष्याबद्दल अनेक अनोळखी रहस्य (parrot interesting facts in marathi) आहेत.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला पोपट पक्षी मराठी माहिती (parrot information in marathi) सांगणार आहे. या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी पोपट या पक्ष्याबदल खूप मजेशीर माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल.

पोपट पक्षी माहिती parrot information in marathi (३०० शब्दात)

पोपट हा अतिशय सुंदर, शांत आणि मनमोहक पक्षी आहे. हा पक्षी सर्व पक्षात सुंदर दिसणारा पक्षी आहे. त्यामुळे तो जवळपास प्रत्येक व्यक्तीला आवडतो. शिवाय कित्येक लोक त्याला पाळतात देखील. हा पक्षी विशेषतः लहान मुलांना खूप जास्त आवडतो. कारण पोपट या पक्ष्याचा मिटू मिटू… हा आवाज खूपच गोड असतो.

पोपट हा पक्षी जगभरात बऱ्याच देशामध्ये आढळतो. हा पक्षी विशेषतः उष्णकटिबंधीय आणि अतिउष्ण कटिबंदिय प्रदेशात आढळतो. पोपट हा पक्षी दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडातील अनेक देशात आढळतो. पोपट हा पक्षी भारत देशामध्ये आढळतो. तसेच हा पक्षी भूतान, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका यासारख्या भरताशेजारील देशामध्ये देखील आढळतो.

पोपट या पक्ष्यांच्या जगभरामध्ये ३०० पेक्षा जास्त प्रजाती अस्तित्वात आहेत. या सर्व प्रजाती भिन्न भिन्न आहेत. या मधील काही पोपटाच्या प्रजाती या रंगीबेरंगी आहेत. पोपट हे हिरव्या, लाल, गुलाबी, पारव्या, आणि रंगीबेरंगी रंगाचे असतात. भारत देशामध्ये हिरव्या रंगाचे पोपट आढळतात. हे सर्वच पोपट खूपच सुंदर असतात. आफ्रिका खंडातील काही देशात मनाला आकर्षित करणारे खूपच सुंदर रंगीबेरंगी पोपट आढळतात.

इतर पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दोघेही भिन्न असतात, ते लगेच ओळखले जाऊ शकतात. पण पोपट हा एकमात्र असा पक्षी आहे की ज्यामध्ये नर आणि मादी दोघेही सारखेच दिसतात. त्यामध्ये काहीही फरक नसतो. त्यामुळे पोपट या पक्ष्यामध्ये नर आणि मादी ओळखणे फारच कठीण आहे. जर तुम्हाला एखादा पोपट नर आहे की मादी हे जर ओळखायचे असेल तर तुम्हाला त्याची रक्त तपासणी करावी लागेल. त्याच्या ब्लड रिपोर्ट मधूनच समजेल की हा पोपट नर आहे की मादी.

पोपट हे दिसायला खूपच सुंदर असतात. भारत देशात आढळणाऱ्या पोपट पक्ष्याचा रंग हा हिरवा असतो. पोपटाचे डोळे बारीक गोल आणि चमकदार असतात. पोपटाच्या मानेवर एक काळया रंगाचा गोलाकार पट्टा असतो.

पोपटाची चोच ही लाल रंगाची असून ती थोडी वक्राकार आणि टोकदार असते. पोपटाची चोच फारच मजबूत असते, त्यामुळे पोपट कितीही टणक कवचाची फळे खावू शकतो. पुरू, मिरची, फळे, भाज्या आणि कीटक हे पोपटाचे खाद्य आहे. पोपटाला पेरू आणि हिरवी मिरची फारच आवडते.

पोपटाचे पाय कुरूप दिसतात पण त्यासाठी ते खूपच फायदेशीर आहेत. पोपटाच्या पायाच्या समोर दोन बोटं असतात आणि पाठीमागे दोन असतात. त्यामुळे पोपट पायांच्या मध्ये झाडाच्या फांदीला गच्च पकडून ठेऊ शकतो. शिवाय पोपट हा एकमात्र पक्षी आहे जो आपल्या पायाचा उपयोग वस्तू उचलण्यासाठी करू शकतो. तसेच तो अन्न खात असताना पायाचा उपयोग हतासारखा अन्न धान्य उचलण्यासाठी करू शकतो.

पोपट हा रानावनात झुंड करून राहणारा पक्षी आहे. तो झाडाच्या बुंध्यावर कोरून त्यात आपले घरटे बनवतो. पोपट हा पक्षी नेहमी १०-१५ पोपटाची झुंड करून राहतो आणि तो एकत्र इतर पोपट पक्ष्याबरोर अन्नाच्या शोधात बाहेर पडतो.

पोपट पक्षी माहिती parrot information in marathi (५०० शब्दात)

Parrot information in marathi

पोपट हा पक्षी जगभरात आढळणाऱ्या सर्वात सुंदर पक्ष्यांमध्ये गणला जातो. त्याचे सुंदर रूप अनेकांना मोहात पाडते. हा पक्षी आशिया खंडातील भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका यासारख्या अनेक देशामध्ये आढळतो. तसेच हा पक्षी युरोप आणि आफ्रिका खंडातील देखील बऱ्याच देशात आढळतो.

भारत देशामध्ये आढळणारा पोपट हा हिरव्या रंगाचा असतो. भारत देशामध्ये पोपटाला पोपट, मिटू, रागु, यासारख्या नावाने ओळखले जाते. Parrot हे पोपटाचे इंग्रजी नाव असून त्याचे वैज्ञानिक नाव Psittciformes असे आहे.

पोपट पक्ष्याचा आवाज खूपच मधुर असतो. त्याचे मिटू मिटू… असे ओरडणे सर्वांनाच खूप आवडते. शिवाय पोपट हा खूप बुद्धिमान पक्षी आहे. तो माणसांप्रमाणे बोलू देखील शकतो. पोपटाला जर शिकवण्यात आले तर तो राम राम, नमस्कार, स्वागत आहे, बाय बाय यासारखे शब्द बोलू शकतो. तसेच तो घरातील सर्व सदस्यांची नावे देखील बोलू शकतो.

पोपट (parrot information in marathi) हा खूप हुशार आणि बुद्धिमान पक्षी म्हणून ओळखला जातो. तो माणसांप्रमाणे विचार करू शकतो , संवाद साधू शकतो , त्याला जर शिकवले असेल तर तो एखाद्या विषयावर भाषण देखील देऊ शकतो.

पोपट हा पक्षी पाळीव आणि जंगली दोन्ही देखील आहे. तो जंगलातील किंवा शेतातील झाडाच्या बुंध्यावर घरटी करून राहतो. तसेच तो पाळीव पक्षी असल्यामुळे कित्येक लोक त्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवतात. खूप लोकांना पोपट हा पक्षी पाळायला खूप आवडते. त्यामुळे कित्येक लोक पोपट हा पक्षी पाळतात आणि त्याला दाराच्या समोर पिंजऱ्यात ठेवतात. तो पोपट येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत करतो. त्यांना राम राम, नमस्कार करतो.

पोपट हा पक्षी जवळपास २०-२५ सेमी आकाराचा असतो. त्याच्या पाठीवर हिरवे पंख असतात. तसेच त्याच्ये आयुष्य जवळपास १०-१५ वर्षाचे असते. प्रत्येक प्रजातीचे पोपट हे वेगवेगळ्या आकाराचे असतात शिवाय त्यांचा जीवन कालावधी देखील वेगवेगळा असतो. पोपट या पक्ष्याचे वजन ५०० ते १००० ग्राम असते. काही प्रजातीचे पोपट यापेक्षा देखील अधिक जास्त वजनाचे असतात.

पोपटाला तिखट मिरची आणि पेरू खूप आवडतो. तो याशिवाय इतर फळे, भाज्या, धान्य देखील खातो. पोपट पक्षी मांसाहारी सुद्धा आहे तो अन्न धान्य बरोबर किडे, कीटक देखील खत असतो.

पोपटाची चोच समोरच्या बाजूला बाकदार असते आणि वरची चोच खालच्या चोचीपेक्षा थोडी मोठी असते. त्यामुळे पोपटाला अन्न तोंडाने पकडायला सोपे जाते. शिवाय पोपट आक्रुड या फळाच्या कवचाप्रमाने कठीण फळाचे कवच देखील तोडू शकतो.

नर आणि मादी पोपट सारखेच दिसतात. त्यांच्यात कुठलाही फरक नसतो. मादा पोपट एका वर्षात १० ते १५ अंडी घालू शकते. मादा पोपट नर पक्ष्याप्रमाणे सुंदर आणि आकर्षक असते. पोपट हा पक्षी नेहमी १०-१५ पोपटाच्या झुंड करून राहतो. तो नेहमी अन्न धान्याच्या शोधात एकत्र निघतो.

पोपटाला अनेक नावाने ओळखले जाते. भारत देशात पोपट राघू, मैना, मिटू या नावाने ओळखला जातो. पोपट हा पाळीव प्राणी आहे. त्याला पिंजऱ्यात कैद केले जाते. कित्येक वेळा त्याची काही लोकांद्वरे तस्करी देखील होताना दिसून येते. जंगलात, रानावनात राहणारे आदिवाशी लोक पोपट या पक्ष्यांना पकडून शहरी भागात त्यांची विक्री करतात. तसेच त्यांची शिकार देखील करतात.

जगभरामध्ये जवळपास ३०० पेक्षा जास्त पोपटाच्या प्रजाती आहेत. पण त्यातील बऱ्याच प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पोपट या पक्ष्याचे संरक्षण करण्यासाठी सरकार द्वारे कुठलेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.

पोपट हा पक्षी खूपच सुंदर आहे आणि तो दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे आणि त्याच्या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवणे फार गरजेचे आहे.

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला पोपट पक्षी माहिती (parrot information in marathi) दिली. या पोस्टमध्ये मी पोपट पक्ष्याचे वर्णन खूपच सुंदर शब्दात दिलेले आहे. पोपट पकाह्याबद्दल ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.

तुम्हाला जर आणखी एखाद्या पक्ष्याबद्दल parrot information in marathi माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी पुढच्या पोस्टमध्ये त्यावर नक्कीच माहिती लिहिणार.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *