imgonline com ua CompressToSize atiW4WvcOUHh

होळी (शिमगा) सणाची माहिती, महत्व, निबंध | holi information in marathi

होळी (शिमगा) सण माहिती (holi information in marathi) :- भारत देशात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. त्याच्यातच होळी हा सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणारा सण आहे. या सणाला खूप महत्व आहे.

नमस्कार मंडळी आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला होळी सण माहिती holi information in marathi याबद्दल माहिती देणार आहे.

होळी सणाची माहिती, महत्व, निबंध (holi information in marathi)

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतात अनेक जाती धर्मांच पंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, सण – उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीच भारतातील विविध भागात साजरा केला जाणारा होळी (शिमगा) हा मुख्य सण आहे. हा सण भारतातील विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तसेच होळी या सणाला प्रादेशिक भिन्न भिन्न नावे आहेत.

होळी हा सण महाराष्ट्रातील मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीचा भागात “शिमगा” म्हणून ओळखला जातो. तर याच सणाला इतर भागात फार वेगवेगळी नावे आहेत.

होळी हा सण माणसांच्या जीवनात आनंद, हर्ष, चैतन्य आणि उल्हास घेऊन येणारा आहे. या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येऊन होळी (शिमगा) साजरा करतात. हा सण गावातील एकोप्याचे दर्शन घडवतो.

वसंत ऋतू सुरू झाला की सर्वत्रच चैतन्याचे वातावरण निर्माण होते. हा ऋतू पशू पक्षी, माणसे सर्वानाच खूप प्रिय आहे. कवी आणि लेखकांचा हा ऋतू तर अगदी जीवळ्याचा आहे. वसंत ऋतू वर अनेक कविता प्रसिद्ध आहेत.

ऋतुराज वसंत आला 

आला नवतेज घेऊनी |

वसुंधरा करते साज

साज नवतीचा लेवूनी ||

वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते, झाडे रंगीबेरंगी फुलांनी बहरून निघतात. पशु पक्षी आनंदाने कल्लोळ करू लागतात. वसुंधरा अगदी हिरवा शालू परिधान केल्यासारखी भासते. ठिकठिकाणी देवी देवतांच्या यात्रा, मुहोत्सव सुरू होतात. याच वातावरणात माणसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येतो तो म्हणजे हा होळी सण .

होळी (holi information in marathi) हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण कुठे दोन दिवसांचा असतो तर काही ठिकाणी  चार पाच दिवस देखील साजरा केला जातो. यात प्रादेशिक परंपरेनुसार संगीत, गायन, नृत्य सादर केले जातात.

होळी सणाला ‘ रंगांचा सण ‘ म्हणून देखील ओळखले जाते. कारण या सणाला रंगांची उधळण करून आनंद व्यक्त केला जाते. महाराष्ट्रात याच सणाला शिमगा या नावाने ओळखले जाते. हा सण संपूर्ण भारतात सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो.

होळी सणाचे महत्त्व (importance of holi festival)

Holi information in marathi

होळी (holi festival information in marathi) या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. हा एक सांस्कृतिक उत्सव म्हणून महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, केरळ, गोवा या सर्वच राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण कुठे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा केला जातो तर कुठे या सणाला पारंपरिक महत्व आहे.

आदिवासी भागात हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण म्हणजे आदिवासी लोकांसाठी जणू त्यांची दिवाळीचं असते. पारंपरिक वेशभूषा, नृत्य, गायन, आणि त्याला पारंपरिक वाद्यांची साथ यातून रात्रभर होळी साजरी केली जाते.

आदिवासी लोकांचा होळी सण पाहण्यासारखा असतो. यातून त्यांचे जीवन, राहणीमान, संस्कृती यांची अप्रतिम मेजवानी प्रेक्षकांना बघायला मिळते. त्यांचा पोशाख आणि पेहराव काही अनोखाच असतो. यासाठी ते विशिष्ट प्रकारचे वस्त्र परिधान करतात, त्यात डोक्यावर मोरपिसाची टोपी, अंगावर अनोखे नक्षीकाम करतात आणि ढोलकी, ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य गायन करतात.

आदिवासी जमातींमध्ये होळी हा ८-१० दिवस साजरा केला जातो. यात त्यांचे विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम साजरे होतात. ज्याप्रमाणे इतर जमातींच्या लोकांसाठी दिवाळी हा सण खूप मोठा असतो त्याचप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी जमातींमध्ये होळी म्हणजे एक प्रकारची दिवाळीचं असते. त्यामुळे आदिवासी लोक होळी सणाला खूप महत्व देतात.

महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग देखील खुप उत्साहाने होळी साजरी करतो. यात शेतकरी राजा शेतात बहरून आलेल्या पिकाबद्दल देवाला प्रार्थना करून धन्यवाद देतो. यात अग्निदेवतेला शेतात आलेल्या पिकांचे समर्पण करतो. हा शेतकऱ्यांचा खूप महत्वाचा सण आहे.

या सणाच्या दिवशी होलिका या राक्षशनीचा भगवान विष्णूने वद केला. असत्यावर सत्याचा विजय झाला. त्यामुळे या सणाला खूप महत्व आहे. ” सत्याचा नेहमी विजय होतो ” अशी अनोखी शिकवण या सणामार्फत लोकांना मिळते.

होळी (शिमगा) हा सण कसा साजरा केला जातो ? (How to celebrate holi festival)

होळी हा सण प्रत्येक भागात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी सायंकाळी लाकडे आणि सेणाच्या गोवऱ्या यापासून होळी बनवून पेटवली जाते. गावातील सर्व लोक या सणाला सहभागी असतात.

खेडेगावात होळी या सणाची तयारी १०-१५ दिवस अगोदर पासूनच सुरू होते. लहान मुले गावातील लाकडे आणि शेणाच्या गोवऱ्या जमा करतात. या सणाच्या दिवशी प्रत्येक घरातून पाच शेणाच्या गोवऱ्या चा मान असतो. त्यामुळे स्त्रिया शेणाच्या गोवऱ्या तयार करून ठेवतात.

होळीच्या दिवशी सकाळ पासूनच हलकी वाजवून प्रत्येक घरातून शेणाच्या गोवऱ्या जमा केल्या जातात. गोवऱ्या गोळा करताना लहान मुले हलकी च्या मागे बोंबा ठोकतात. या दिवशी बोंब मारायची म्हणजेच शिव्या देण्याची प्रथा आहे. या दिवशी लहान मुले एकमेकांना शिव्या देऊन आनंद व्यक्त करतात.

संध्याकाळच्या वेळी सर्व गावकरी एकत्र जमतात. एका गोल रिंगणात एरंडचा फांटा ठेऊन त्याच्या भोवताली शेणाच्या गोवऱ्या आणि लाकडे रचतात. होळी पेटवून सर्व गावकरी होळीची पुजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून होळी भोवताली पाणी फिरवतात. लोक नारळ होळीत टाकतात आणि भाजलेले नारळ बाहेर कडून त्याचा प्रसाद सर्वजण खातात.

या दिवशी होळीत वर्षभर केलेले सर्व पाप धुवून जावो आणि मी यापुढे नेहमी सत्याचा मार्ग अवलंब करेल अशी प्रार्थना केली जाते. होळीचा सण पुरण पोळीचा मान असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो.

होळी हा सण का साजरा केला जातो ? (होळी सणाची आख्यायिका )

होळी सणाच्या अनेक कथा आख्यायिका प्रसिद्ध आहेत. एका आखयायिकेनुसार एक होलिका नावाची राक्षाशिन होती. ती गावातील लहान मुलांना खूप त्रास देत असे. त्यामुळे या दिवशी गावातील लोकांनी एकत्र येऊन तिचा वध केला होता. म्हणून गावकरी होळी हा सण साजरा करतात.

यात भक्त प्रल्हादाची कथा खूप प्रसिद्ध आहे. हरिण्यकश्यप नावाचा एक राजा होता. तो देवांच्या विरुद्ध होता, त्याला देवाची पूजा करणे बिलकुल पसंद नव्हते. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद नृसिंह देवाचा निस्सीम भक्त होता. तो सतत देवाचा जप करत असे.

हरिण्यकश्यप राजाने त्याला खूप समजावले तरी तो ऐकत नसे. म्हणून राजाने त्याला मारण्याचा बेत आखला. यासाठी त्याने भक्त प्रल्हाद ला उकळत्या गरम तेलात सोडले, हत्तीच्या पायाखाली सोडले, खोल दरीत फेकले तरी तो प्रत्येक वेळी वाचत असे. म्हणून त्याने होलिका नावाच्या रक्षाशिनीला प्रल्हाद ला मारण्यास सांगितले.

होलिकाला अग्नीत जिवंत राहण्याचा वर मिळालेला होता. म्हणून तिने भक्त प्रल्हाद ला मांडीवर ठेवून अग्नीत प्रवेश केला. पण भगवान विष्णूच्या कृपेने सर्व उलटे झाले भक्त प्रल्हादला काहीही झाले नाही पण ती होलिका मात्र आगीत भस्मसात झाली. तेंव्हा पासून लोक सत्याचा असत्यावर विजय म्हणून होळी हा सण साजरा करतात.

आपण काय शिकलो ?

मंडळी आजच्या पोस्टमध्ये आपण होळी (शिमगा) सनाबद्दल माहिती (holi information in marathi) जाणून घेतली. मला अशा आहे की तुम्हाला ही सर्व माहिती नक्कीच आवडली असेल.

तुम्हाला देखील होळी या सानाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्या भागात होळी सण कसा साजरा केला जातो याबद्दल सुद्धा कमेंट करून कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *