gudi padwa information in marathi

गुढीपाडवा सणाची माहिती (gudi padwa mahiti), महत्व, निबंध | gudi padwa information in marathi 2021

गुढीपाडवा सणाची माहिती (gudi padwa mahiti), महत्व, निबंध | gudi padwa information in marathi 2021:- भारत देश हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. या देशात अनेक सण वार खूप मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. वसंत ऋतूमध्ये पहिल्या आठवड्यात साजरा केला जाणारा गुडी पाडवा हा सण देखील संपूर्ण भारतभर खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

आजच्या या पोस्टमध्ये आपण गुढीपाडवा सणाची माहिती gudi padwa information in marathi, गुढीपाडवा सणाचे महत्त्व (gudi padwa mahiti), गुढीपाडवा का साजरा केला जातो ? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

गुढीपाडवा मराठी माहिती 2021| gudi padwa information in marathi | gudi padwa mahiti

गुढीपाडवा हा सण भारतीय संस्कृतीमध्ये साजरा केला जाणारा मुख्य सण आहे. हा सण मुख्यतः महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. याच प्रमाणे भारतातील इतर राज्यात देखील गुढीपाडवा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. शिवाय याला वेगवेगळी प्रादेशिक नावे देखील आहेत.

गुढीपाडवा सण हा वसंत ऋतूमध्ये येणारा खूप पवित्र सण आहे. या सणाला पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा सण म्हणजे साडे तीन मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे.

गुढीपाडवा सणाच्या दिवशी लोक नवीन वस्तूंची खरेदी करतात, नवीन कार्याला सुरुवात करतात. तसेच या दिवशी सोने चांदी देखील खरेदी केली जाते. गुढीपाडवा सण हा साडे तीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या सणाबाबत लोकांची खूप निष्ठा आहे. लोकांची अशी धारणा आहे की या दिवशी सुरू केले कार्य सफल आणि यशस्वी होते. त्यामुळे या तिथीला लोक खूप शुभ आणि पवित्र मानतात.

गुडी पाडवा (gudi padwa marathi mahiti) सणाच्या दिवशी प्रत्येक घरोघरी गुडी उभारली जाते. यासाठी बांबूच्या काठीचा वापर केला जातो. घरातील स्त्रिया गुढीची पूजा करून नैवैद्य दाखवतात.

गुढीपाडवा सण का साजरा केला जातो ?

गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यातील पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा सण सौर पंचागणुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो. हा सण साजरा करण्यामागे अनेक आख्यायिका आणि कथा प्रसिद्ध आहेत.

गुढीपाडव्याचा दिवशी भगवान विष्णूने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती अशी अख्यायिका आहे. त्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी गुडी पाडवा हा सण साजरा केला जातो.

दुसरी एक प्रचलित कथा अशी सांगितली जाते की या दिवशी भगवान राम चौदा वर्षांचा वनवास संपवून आयोद्या नगरीत परत आले होते. त्यावेळी आयोड्या नगरीतील लोकांनी घराला तोरून बांधून आणि गुडी उभारून त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे तेंव्हापासून गुढीपाडवा हा सण संपूर्ण भारतभर खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

गुडी पाडवा सण कसा साजरा केला जातो ?

गुढीपाडवा या सणाच्या दिवशी घरातील सर्व सदस्य लवकर उठून स्नान करतात. नवीन कपडे परिधान करतात तर काही राज्यात पारंपरिक पोशाख आणि वेशभूषा केली जाते. त्यानंतर गुडी उभारण्यासाठी लांब वेळूची काठी गरम पाण्याने धुवून स्वच्छ केली जाते. घरातील स्त्रिया गोड धोड पुरण पोळीचा स्वयंपाक करण्यात गर्क असतात. पुरुष मंडळी गुडी उभारतात.

या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छ्ता केली जाते. खेडेगावात घरासमोरील अंगणात सेणाने सारवून सडा टाकला जातो. त्यानंतर अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. घराच्या मुख्य द्वारापासी गुडी उभारली जाते. त्यामुळे तेथील देखील स्वच्छ्ता केली जाते.

धुतलेल्या बांबूच्या काठीला रेशमी कापड किंवा वस्त्र बांधले जाते त्यानंतर गुडीच्या वरच्या टोकाला तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला जातो. त्यांच्यासोबतच आंब्यांची पाने आणि कडुलिंबाचा दहाला ठेवला जातो आणि गुडिच्या वरच्या भागाला साखरेची माळ लावली जाते. साखरेच्या माळेलाच काही ठिकाणी गाठी देखील म्हटले जाते.

नंतर सजवलेली ही गुडी मुख्य दरवाज्यापाशी पाठावर ठेवली जाते. पाठाच्या भोवताली रांगोळी काढली जाते. पाठाच्या शेजारी एक कलश ठेवला जातो. त्यात नारळ आणि आंब्याची पाने ठेवली जातात.

गुडी उभारल्यानंतर घरातील सर्वजण गुढीची पूजा करून नैवैद्य दाखवतात. गुढीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वजण गुडीच्या पाया पडून गूळ आणि कडुनिंबाच्या पानाचा प्रसाद खातात. गुडी पाडवा सणाच्या दिवशी कडुनिंबाच्या पणाला खुफटवा दिले जाते.

गुढीपाडव्याचे महत्त्व (gudi padwa mhatwa) :

गुढीपाडवा या सणाला जरी पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व असेल तरी तो आजही म्हणजे आधुनिक युगात देखील तितकाच महत्वाचा आहे. या सणाला नैसर्गिक, धार्मिक आणि वैज्ञानिक असे महत्व आहे. त्यामुळे हा उत्सव गुढीपाडवा साजरा का करतात याचे उत्तर तुम्हाला मिळू शकेल.

गुढीपाडवा साजरा करण्याचे नैसर्गिक महत्व :

 • गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. या वेळी वसंत ऋतू चे आगमन झालेले असते. झाडांना वेलींना नवीन पालवी फुटते, झाडे रंगीबेरंगी फुलांनी नटलेली असतात. वातावरण थंड आणि आल्हादायक असते. अशा वातावरणात वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
 • या सणाच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांना खूप महत्व दिले जाते. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने, जिरे, मिरे, लवंग, गूळ यांचे मिश्रण करून खाल्ले जाते.
 • कडुनिंब ही खूप गुणकारी वनस्पती आहे. कडुनिंबाची पाने खाल्याने रक्त शुद्ध होते, भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, त्वचेचे रोग, इत्यादी आजार बरे होतात.
 • तसेच या दिवशी कडुनिंबाचे पाने पाण्यात टाकून स्नान केले जाते, त्यामुळे त्वचेचे रोग नाहीसे होतात.

गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व:

 • आध्यात्मिक रित्या गुढीपाडवा हा सण खूपच शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी सुरू केलेले कार्य नेहमीच सफल आणि आदर्श ठरते.
 • गुढीपाव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी नवीन वस्तू, सोने चांदी यांची खरेद करणे शुभ आणि लाभदायक मानले जाते.
 • या दिवशीच भगवान विष्णूने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती असे पौराणिक कथांमध्ये सांगण्यात येते. त्यामुळे गुढीपाडवा हा सण जणू सृष्टीचा जन्मदिवस च आहे असे म्हणता येईल.
 • या दिवशी दुसरी एक महत्वाची कथा म्हणजे भगवान राम यांनी रावणाचा पराभव वध करून आणि चौदा वर्षांचा वनवास संपवून आयोद्यात प्रवेश केला होता. त्यामुळे आनंदीत झालेल्या आयोद्येतील जनतेने भगवान राम यांचे स्वागत करण्यासाठी गुड्या उभारल्या होत्या.
 • गुढीपाडवा हा एक यशाचे प्रतिक आहे. यश आणि सफलता नेहमीच मोठी असते त्यामुळे या दिवशी उंच गुढ्या उभारल्या जातात.

गुढीपाडवा सणाचे सामाजिक महत्व :

 • गुढीपाडवा हा सण खूप पवित्र मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी सुरू केलेले काम यशस्वी होते. त्यामुळे या दिवशी खूप लोक नवीन कामाला, कार्याला प्रारंभ करतात. त्या कामाबद्दल मनात सकारात्मक विचार करतात.
 • गुढीपाडवा हा सण सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव आहे. या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र जमतात, एकमेकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतात.
 • या दिवशी दान करण्याची प्रथा आहे. त्यामुळे लोकांमध्ये मदत करण्याची वृत्ती जोपासली जाते.

गुढीपाडवा मराठी माहिती (gudi padwa mahiti marathi)

मंडळी आजच्या या पोस्टमध्ये आपण गुढीपाडवा सणाची माहिती,महत्व, निबंध gudi padwa information in marathi, तसेच गुढीपाडवा का साजरा केला जातो? गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती घेतली.

मला आशा आहे की गुढीपाडवा मराठी माहिती (gudi padwa mahiti) ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. यामध्ये मी गुढीपाडवा सणाबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर गुढीपाडवा साणाबद्दल आणखी विशेष माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

तसेच ही पोस्ट तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईक यांच्यासोबत फेसबुक, व्हॉट्सॲप वर नक्की शेअर करा, धन्यवाद…!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *